Ajit Pawar on Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणावरुन अजित पवारांचा समीर वानखडेंवर शाब्दीक हल्ला, म्हणाले- ‘तेव्हा मलिकांना खोटं ठरवण्याचा…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Sameer Wankhede | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन (Aryan Khan Drug Case) एनसीबीचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा उल्लेख केला. तसेच मलिक यांनी स्पष्ट भूमिका घेतील त्यावेळी त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Ajit Pawar on Sameer Wankhede)
अजित पवार म्हणाले, एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) तात्पुरता दिलासा देत 8 जूनपर्य़ंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र, या प्रकरणासंदर्भातील पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. सीबीआयला तीन जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यानंतर पाच दिवसांनी आठ जूनला सुनावणी होणार आहे. (Ajit Pawar on Sameer Wankhede)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंवर शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) काही रक्कम
मागितल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआयने उल्लेख केला आहे.
यापूर्वी आमचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टपणे भूमिका मांडण्याचं काम केलं. माध्यमांनी ती भूमिका दाखवली.
मात्र तेव्हा मलिक यांना खोटं ठरवण्याचा, ते जाणीवपूर्वक आरोप करत आहेत आणि वानखेडे अत्यंत प्रामाणिक,
स्वच्छ आहे अंस सांगण्याचा प्रयत्न झाला. आता लोकांसमोर सत्य आलं आहे. इतरांनी काही बोलण्याचं कारण नाही.
स्वत: सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने याबाबत भूमिका स्पष्ट केल्याचे अजित पवार
यांनी सांगितले.
Web Title : Ajit Pawar on Sameer Wankhede | ajit pawar mention allegations of bribe by sameer wankhede from shahrukh khan in aryan khan case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा