Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्रकरुन मारहाण; सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी- विरोधी पक्षनेत अजित पवार यांची मागणी

मुंबई : Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील (Palghar District) कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू (Dahanu) येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण (Beating Woman By Stripping Clothes) केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवसी बांधवांची परवड सुरु आहे, पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत, तरी आदिवसी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दोन दिवस आधी
पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ता.डहाणू ) येथे दि.6 मार्च, 2023 रोजी पाण्यासाठी आदिवासी महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित आरोपीला कडक कारवाई करावी. राज्याच्या राजधानी शेजारी असणाऱ्या अदिवासी बांधवांना अशा दुर्दैवी प्रसंगांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होत आहे, तसेच राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, गुन्हा दाखल करायला सुध्दा विलंब करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीकरुन पिडीत आदिवासी भगिनींना न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

Web Title :-   Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | Leader of Opposition Ajit Pawar took the government to task in the case of stripping and beating a tribal woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Japan International Cooperation Agency (JICA) | राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘जायका’समवेत चर्चा

Rita India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या सौजन्याने ‘महिलांचे आरोग्य आणि जागरूकता’ याविषयावरील कार्यशाळा संपन्न

Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदेवर पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडाचे पुनर्रोपण करत असताना मधमाशांकडून हल्ला