Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | राज्य मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांची पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | डागाळलेल्या आमदारांना मंत्री बनवणे अत्यंच चुकीचे आहे. शिवाय, सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत. असे असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान न देणे हा समस्त महिला वर्गाचा अवमान असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार सत्तार आणि राठोड यांच्या समावेशाने वादग्रस्त ठरला आहे. शिवाय, मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने देखील विरोधक सरकारवर टीका करत आहेत. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Maharashtra Cabinet Expansion) टीका करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मंत्रीमंडळाची यादी बघितली, तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना स्थान दिले आहे. ज्यांना कोणतीही क्लिनचीट मिळालेली नाही, अशा आमदारांनाही त्यांनी मंत्रीमंडळात घेतले आहे. हे फार चुकीचे पाऊल शिंदे-फडणवीस सरकारने उचलले आहे, हे सर्व महाराष्ट्र बघतो आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच आमदारांवर प्रचंड आरोप केले होते. आता त्यांनाच मंत्रीमंडळात घेतले आहे. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

अजित पवार पुढे म्हणाले की, आपण नेहमीच महिलांना सन्मान देत असतो. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली पाहिजे असे म्हणतो.
आज विधानसभेत ज्या महिला आमदार आहेत. त्यापैकी सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत.
असे असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान न मिळणे हे दुर्दैवी आहे. हा महिला वर्गाचा अवमान आहे.

 

Web Title :- Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | NCP leader ajit pawar criticized shinde fadnavis government on cabinate expansion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू