Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका लोकशाहीत चुकीची’; अजित पवारांनी सरकारला सुनावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते (Ajit Pawar) आज मुंबईत विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. ‘आमच्या सरकारच्या काळात जर कोणी आंदोलनाची भूमिका घेतली तर, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जात होता. मात्र आताचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी भूमिका घेणे लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचे आहे. सरकारने शेतकऱ्यांना वेळ दिला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांवर जलसमाधीची वेळ येऊन देता कामा नये,’ असे ते म्हणाले आहेत. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

 

अजित पवार पुढे म्हणाले,’ शेतकर्‍यांच्या मनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल मोठी नाराजी आहे. ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस झाला, त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती, त्याप्रकारचे मदत त्यांना मिळाली नाही. त्याशिवाय पीकविम्याचे पैसे तुटपुंजे मिळत आहेत, शेतकऱ्यांनी पीक विमा दीड दोन हजारांना उतरवला, पण त्यांच्या खात्यात फक्त 70 ते 90 रुपये आले आहेत. विमा कंपन्यांना ऐकायला भाग पाडण्यासाठी आवश्यकता आहे. केंद्रसरकारची मदत घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही शेतकरी कोर्टात गेले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विमा राज्यसरकार काढत असते. त्याला काही प्रमाणात केंद्रसरकारची मदत होत असते. त्यामुळे स्वतः च्या पीक विम्याच्या पैशासाठी कोर्टात जाण्याची वेळ महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि वेळ पडली तर केंद्रसरकारला हस्तक्षेप करायला सांगितले पाहिजे.’ अशी मागणी अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

“राजू शेट्टी यांनी ऊसासंदर्भात आंदोलन केले आहे.
सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष घातले नाही तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यामुळे, शेतकरी नेते असोत किंवा शेतकऱ्यांच्या संघटना असोत किंवा मग शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारा एखादा पक्ष असो.
त्यांच्याकडून शेतकऱ्यांसंदर्भात येणाऱ्या मागण्या सरकारने समंजस भूमिका घेऊन हाताळल्या पाहिजेत,” असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

 

Web Title :- Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | NCP leader ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis led maharashtra government for neglecting farmer related issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…