Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ऑनलाईन नोंदणी केलेल्या 15 हजार शेतकऱ्यांचे धान पडून; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा ! विरोधी पक्षनेते अजित पवार आग्रही यांची मागणी

 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील 30 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 15 हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असतांना सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी (Farmers In Maharashtra) अडचणीत आले आहेत, तरी सरकारने तातडीने राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील 30 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 15 हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असतांना शासनाने दि.31 जानेवारी 2023 पासून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील भात खरेदी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कल्पना न देता अचानक बंद केली आहेत. भात खरेदी केंद्र अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरलेले असून शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

पालघर प्रमाणेच कोकण, विदर्भ व राज्यातील इतर भागात भात खरेदी केंद्रे अचानक बंद केल्यामुळे
शेतकऱ्यांना नाईलाजाने स्वस्त किंमतीत व्यापाऱ्यांना भात विकण्याची परिस्थिती ओढवलेली आहे.
पालघर जिल्हयातील जव्हार विभागीय कार्यालय अंतर्गत 15 हजार शेतकऱ्यांची धान खरेदी अद्यापही प्रलंबित आहे.
रायगड जिल्हयातील माणगांव सेंटरची 400 शेतकऱ्यांची 7 हजार क्विंटल भात खरेदी प्रलंबित आहे.
माणगांव केंद्रावर अजून 10 हजार क्विंटल खरेदी होऊ शकते. अशीच परस्थिती विदर्भांतील भात खरेदी केंद्रावर आहे.
तरी शासनाने बंद केलेली खरेदी केंद्रे पुन्हा सुरु करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

 

Web Title :- Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | Paddy of 15 thousand farmers registered online; Time on farmers to sell paddy to traders at cheap prices

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट