Ajit Pawar On Shivajirao Adhalrao Patil | एक मिनिट, मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल! आढळरांवाना किती मताधिक्य मिळेल? प्रश्नावर दादांचे थेट उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Shivajirao Adhalrao Patil | शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, आढळरावांना किती मताधिक्य मिळेल, असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी परखडपणे उत्तर देत म्हटले की, एक मिनिट, मी काही ज्योतिषी नाही, आढळराव पाटील हेच विजयी होतील. (Shirur Lok Sabha)

शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना आज मोठे शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.(Ajit Pawar On Shivajirao Adhalrao Patil)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला शपथनामा जाहीर केला आहे.
याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, माझा त्या पक्षाची काहीही संबंध नाही, मी तो जाहीरनामा वाचला नाही,
वाचल्याशिवाय उत्तर देणार नाही. तसेच, ते विरोधक असल्याने सत्ताधारी पक्षावर आरोप करणारच, ते त्यांचे कामच आहे.
पण, देशात मोदी सरकारने (Modi Govt) अनेक काम केली आहेत. विरोधकांचे काम, विरोध करणे हेच आहे.

आमच्या पक्षाचे आठ उमेदवार निवडून येतील, असा दावा शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)
यांनी केला आहे, याबाबत अजित पवार म्हणाले, निकाल येऊ द्या, मग समोर येईल किती जागा येतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र