Ajit Pawar On Shrikant Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत पुत्र श्रीकांत शिंदे बसल्याचा फोटो व्हायरल, अजित पवार म्हणाले – कोणत्या खुर्चीवर कुणी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Shrikant Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसून कामकाज करत असल्याचा फोटो सध्या खुप व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत ते मुख्यमंत्र्यांचे घर आहे. कुणाच्या घरात कुणी कोणत्या खुर्चीवर बसावे हा शेवटी त्या घरातील अंतर्गत प्रश्न आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar On Shrikant Eknath Shinde)

 

व्हायरल फोटोवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ते मुख्यमंत्र्यांचे घर आहे. मात्र, मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर केवळ मुख्यमंत्रीच बसतात. आम्हीही ते अनेक वर्षे अनुभवत आहोत. उद्या कुणाच्या घरात कोणत्या खुर्च्या ठेवल्या आहेत, त्यावर कोणी बसावे कोणी बसू नये हा शेवटी घरातील अंतर्गत प्रश्न आहे. ती खुर्ची मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल. घरात मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा इतर लोक असतात. खरं तर अशा गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो आहे.

पवार म्हणाले, पालकमंत्री असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार असतो.
हा अधिकार मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असेल तर असतो. श्रीकांत शिंदेंबाबत नक्की काय झाले आहे,
याबाबत खासदार शिंदेंनी माहिती दिल्याशिवाय स्पष्टता येणार नाही. ज्याने-त्याने ज्या-त्या नियमांचे पालन केले पाहिजे.

 

Web Title :- Ajit Pawar On Shrikant Eknath Shinde | ajit pawar comment on mp srikant shinde over sitting on cm eknath shinde chair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई