Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा

मुंबई : Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | पुणे शहरासह परिसराला पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या धरणांच्या (Dams In Pune District) परिसरात गेल्या काही वर्षात बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रहिवासी प्रकल्पांसह काही कमर्शिअल प्रकल्पसुध्दा कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पातून प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. या सांडपाण्यामुळे धरणांतील पाणी प्रदुषित होते, धरणातील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने ताताडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District)
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक धरणे पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील या धरण परिसरात अनेक लोक सेकंड होम तसेच रिसॉर्ट उभारत आहेत. (Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District)
गेल्या काही दिवसात अशा प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकल्पांमधुन प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते.
हे सांडपाणी पुणे शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला (Khadakwasala Dam),
पवना (Pawana Dam), टेमघर (Temghar Dam), वरसगाव (Varasgaon Dam),
पानशेत (Panshet Dam), चासकमान (Chaskaman Dam) , भामा-आसखेड (Bhama Askhed Dam )
या धरणातील पाण्यात मिसळून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.
धरणातील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकाससह संबंधित खात्यांचा समन्वय करत राज्य शासनाने तातडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
Web Title :- Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | Implement a concrete program to prevent water pollution in dams in Pune district
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update