Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids | यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात’

0
152
Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids ajit pawar reaction over yashwant jadhav diary and gift to matoshree
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids | शिवसेना नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याकडे 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला (Incom Tax Department) काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यामध्ये कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली. या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री कोण ? यावरुन चर्चा रंगली आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids)

 

अजित पवार म्हणाले, ”की तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करेल.
अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळी होतात त्यावेळी तुम्ही विचारता.
पण यामध्ये यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वत:च्या आईला मातोश्री म्हणतात.
काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात.
ते स्वत: सांगत असताना तुम्ही त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात ?” असा उलट सवाल देखील अजित पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids)

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यात एक डायरी मिळाली आहे.
या डायरीत, 50 लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे दोन कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा केला गेला.
यानंतर भाजपाने (BJP) शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली.
या दरम्यान, आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते,
तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने 2 कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.
दरम्यान प्राप्तिकर विभागाला काही संशयास्पद वाटल्याने याबाबत चौकशी केली जातेय.

 

 

Web Title :- Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids | ajit pawar reaction over yashwant jadhav diary and gift to matoshree

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा