Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक जिल्ह्यात, शहरात रुग्णाची संख्या घटत असल्याने तेथील निर्बंध शिथिल केले आहेत. तर बारामती (Baramati) शहर आणि ग्रामीण भागातही कोविड (covid) रुग्णाचा आकडा कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार (ajit pawar) यांनी माहिती दिली आहे.
बारामतीतील (Baramati) कोरोना (covid) रुग्णाची संख्या कमी होतेय हे समाधान असल्याचं म्हणत, पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आत आल्यास निर्बंध आणखी शिथिल केले जातील.
तसेच आगामी 2 दिवसांनी स्थिती बघून प्रशासनाने निर्णय घ्यावा परंतु सरकारने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केली जावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवार (ajit pawar) यांनी दिले आहेत.
त्यावेळी पवार हे बारामतीत आढावा बैठकीत बोलत होते.

Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका

अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान बोलताना अजित पवार (ajit pawar) म्हणाले, कोरोना (covid) प्रतिबंधक लस अधिकाधिक उपलब्ध करण्यासंदर्भातची कार्यवाही सुरु आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे.
म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती बारामतीतील ग्रामीण भागात सर्वांपर्यंत पोहोचवावी, असं अजित पवार (ajit pawar) यांनी म्हटलं आहे.
तसेच, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पवार यांना माहिती दिली.

Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

यावेळी, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,
पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे,
उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव,
पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे,
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,
महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे,
अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,
तहसिलदार विजय पाटील,
गटविकास अधिकारी राहूल काळभोर,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी बैठकीस उपस्थित होते.

भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर ! एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’; ‘आयपीआरसीएल’ सोबत करार

दरम्यान, हिराभाई बुटला विचारमंच यांच्याकडून फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक व्हॅन) चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार (ajit pawar) यांच्या हस्ते करण्यात आले.
दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. हिंजवडी, पुणे यांच्या उरफ फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर देण्यात आले. याचेही लोकार्पण अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते झाले.
यावेळी अमेरीकेचे डॉ. दीपेश राव यांच्याकडून म्युकर मायकोसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शनचे 25 डोस रुई ग्रामीण रुग्णालयास अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते देण्यात आले.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’