पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शारदानगर येथे बांधलेल्या राज्यस्तरीय जलतरण तलावाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील सर्व नेते हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आदींनी यावेळी उपस्थिती लावली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांना घरचा आहेर दिला आहे.
शारदानगर मध्ये बांधलेल्या जलतरण तलावाची पाहणी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अशाच प्रकारचा अद्ययावत तलाव इंदापूरला बांधण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगितले. याच त्यांच्या भाषणाचा धागा पकडून अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, या तलावाचे बजेट सात कोटींच्या घरात होते. पण आम्ही जातीने लक्ष घालून काटकसरीने ते पाच कोटी केले. कुठेही गुणवत्तेत तडजोड केली नाही. त्यासाठी आमची खास टीम काम करत होती. पण तिकडे इंदापूरला देखरेख कोण करणार, लक्ष कोण ठेवणार, अशी दर्जेदार विकासकामे उंटावरुन शेळ्या हाकून होत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. हा अप्रत्यक्ष सुप्रिया सुळे यांना टोला होता.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, मला राष्ट्रवादीमुळे अनेक संस्थांचे अध्यक्षपद मिळाले.
कोणत्याही संस्थेची होत असलेली विकासकामे कमी पैश्यात होणे प्राप्त असते.
राज्यस्तरीय जलतरण तलावाचे बजेट सात कोटींपेक्षा जास्त होते. पण त्यात आम्ही लक्ष घालून पाच कोटी केले.
मतदार संघातील विकासकामांसाठी आम्ही सर्व क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्यास तयार आहोत.
इंदापूरला देखील अशीच टीम तयार करू. बारामतीप्रमाणे तेथे देखील सुविधा देऊ, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
Web Title :- Ajit Pawar | opposition leader ajit pawar gives reply to mp supriya sule regarding development works
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा