Ajit Pawar | वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल 2 कोटी 38 लाख, चाहात काय…?, अजित पवारांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचे चार महिन्याचं खानपानाचं बिल 2 कोटी 38 लाख रुपये आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जातय काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना केला. आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय. माझे अनेक जवळचे सहकारी मुख्यमंत्री होते, मात्र त्यांच्या काळात असं कधी बघायला मिळालं नाही, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या (Legislative Session) पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालत असल्याची घोषणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विधी पक्षांचे शिष्टमंडळ नवनियक्त राज्यापाल बैस (Governor Ramesh Bais) यांची भेट घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला.

हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा

जाहिरातीच्या नावाखाली सरकारने 50 कोटी खर्च केलाय. मुंबई महानगर पालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) आम्ही माहिती घेतली तर तिथून आठ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे. यांचे हसरे फोटो दाखवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.

मनसेच्या आमदाराने वेगळी भूमिका घेतली तर…

शिवसेनेच्या (Shivsena) 40 लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. म्हणून पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना कसं दिलं? असा प्रश्न उपस्थित करत
अजित पवार यांनी निवडणूक आयोगावरही (Election Commission) निशाणा साधला.
तसेच मनसेकडे (MNS) एकच आमदार आहे, मग उद्या त्याने वेगळी भूमिका घेतली तर मनसे पक्ष आणि
रेल्वे इंजिन त्याला देणार का? असा सवालही त्यांनी विचारला.

कसब्यात काय झालं उद्या परवा बोलेने

सध्या कसबा आणि चिंचवडमध्ये (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) मतदान सुरु आहे.
त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण कसबा आणि चिंचवडमध्ये दिवसभर काय घडलंय आणि काल पण काय
घडलंय हे मी उद्या सांगेन. कारण आत्ता बोललो तर त्याच्यातून आणखी वेगळा अर्थ काढला जाईल.
पण आम्ही उद्या परवा निश्चितपणे बोलू असे अजित पवार यांनी सांगितले.

Web Title :- Ajit Pawar | opposition leader ajit pawar strongly criticized on eknath shinde devendra fadnavis led government on eve of maharashtra assembly session