Ajit Pawar | ‘हा कोणता फाजिलपणा सुरू आहे? एकेकाच्या कानाखाली काढेन’, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) दृष्टीने उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल अजित पवार (Ajit Pawar) यांनी जो लोकसभेत चांगलं काम करेल त्याचा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तिकीटासाठी विचार केला जाईल, असं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, लोकांना पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली काढेन. बाकी काही नाही करायचं. यातून तुमची बदनामी होत नाही. पवार साहेबांची (NCP Chief Sharad Pawar) बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरु आहे? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. पदाचा राजीनामा घेणार आणि टोकाचं वागेन. एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यावर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून लोक तुमच्याकडे बघतातात, असंही अजित पवार म्हणाले.

या बैठकीत अजित पवार यांनी नेत्यांना काही सूचना आणि विनंती देखील केली आहे. तर या बैठकीत बोलताना पवार यांनी 10 तारखेला असणाऱ्या वर्धापन दिनाच्या (NCP Foundation Day) तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही देखील मिटिंग घ्या, तयारी सुरु करा. आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मुळशीच्या लोकांनी देखील काम करायचे आहे. त्यांना देखील पदं दिली आहेत. भांडायचं नाही, नाहीतर एका-एकाच्या कानाखाली आवाज काढीन, अशी तंबी दिली.

तुम्ही पदाधिकारी म्हणून त्या पदावर बसता.
ते अलिकडे लगेच व्हिडिओ बनवतात, त्यामुळे केलेल्या कामाचा सत्यानाश होतो.
केलेल्या कामावर पाणी फिरवता, अशा घटना अजिबात घडता कामा नयेत.
त्याबद्दल मी निर्वाणीचा इशारा प्रांत अध्यक्षांसमोर देत आहे.
मी नंतर अजिबात कोणाचं ऐकणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.
या बैठकीला आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe)
यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

Advt.

Web Title : Ajit Pawar | otherwise we make noise under each others ears ajit pawar told the ncp workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Pune Police News | पुणे पोलिस : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी निधन