Ajit Pawar | ‘NCB प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेतलं जातंय’; अजित पवार म्हणाले – ‘उगाच कोणाच्या तरी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझ ड्रग्स प्रकरणात (cruise drugs case) एका मंत्र्याच्या मुलाचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत होता. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, यामध्ये जे कोणी असतील ते तपासा. मात्र हे करत असताना उगाच कोणाच्या तरी मुलाची नावे घेऊन त्यांचे करिअर का बदनाम करता? नियम (Rules) कायदा (Act) सगळ्यांना समान असतो यामुळे जो कोणीही यात असेल तर त्याला शिक्षा करा असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. ते पुण्यात बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्याबाबत (sugar factory) वेगवगेळ्या यंत्रणांनी चौकशी करुनही काही निष्पन्न झालेले नाही.
25 हजार कोटींचा भ्रष्टाचार (Corruption) हा आरोप खोटा आहे.
साखर कारखान्यांबाबतीत खोटी आकडेवारी सादर करुन आरोप केले जात असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एनसीबी (NCB) प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव घेतलं जात आहे.
यावर बोलताना नियम कायदा सर्वांना सारखा आहे.
त्यामुळे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल.
मागील काही दिवसांपासून मोठमोठ्या व्यक्तीचे नाव घेण्याचे प्रकार सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, दिवाळीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरु करण्याचा विचार आहे. तसेच मागील 9 दिवसांमध्ये लसीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे.
राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे.
लस घेऊनही 60 वर्षावरील नागरिकांमध्ये कोरोनाची (Corona) लागण होत असल्याचे आढळून आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ajit pawar | parth pawar ncb case ajit pawar said Why do you defame someone’s career by taking their child’s name?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update