Ajit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित पवारांची फटकेबाजी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गंमतीने असे म्हणतो की पेट्रोल 100 च्या पुढे गेलं की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल, अशा मिश्किल शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार (Ajit Pawar) बारामती येथे बोलत होते.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. त्यातच बहुतांश पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (दि.25) बारामती (Baramati) दौऱ्यावर होते. अजित पवार यांच्या हस्ते एमआयडीसी (MIDC) येथील एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवरुन मिश्किल टिप्पणी केली.

अजित पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru)
यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले.
आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत.
त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तिथे त्यांचा फोटो लावायचाच असा नियम केला आहे.
पेट्रोल भरताना त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.
घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल या पवार यांच्या टीप्पणीवरुन उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Web Titel :-  Ajit Pawar | petrol price ajit pawar narendra modi pune baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,723 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Dhol Tasha Pathak | पुण्याच्या ‘त्या’ ढोल-ताशा पथकातील 15 मुलींसह 60 जणांना हैद्राबादमध्ये डांबलं होतं, ‘मनसे’च्या रूपाली ठोंबरे-पाटील अन् सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशींनी लढवली ‘शक्कल’, सर्वांची सुखरूप सुटका

UPSC Result | ‘महाराष्ट्रात पहिली आलेल्या पुण्याच्या मृणालीनं सांगितलं यशाचं ‘गुपित’