Ajit Pawar | पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के, अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) पुण्यात कोरोना आढावा बैठक अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे देखील उपस्थित होते. यावेळी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 18 टक्के झाल्याचे सांगून अजित पवार (Ajit Pawar) यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आज दिवसभरात पुणे शहरामध्ये 1104 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी, पालकांचा लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 जानेवारी नंतर 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. याशिवाय फ्रंट लाइन वर्कर्स (Front Line Workers) यांना देखील बुस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्कच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहे. परंतु हे मास्क उपयोगाचे नाहीत. सर्वांनी डबल लेअर चे मास्क (Double Layer Mask) किंवा N95 मास्क वापरण्याचे आवाहन अजित पवार यांनी दिली. तसेच उद्यापासून पासून मास्क शिवाय (Mask) कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याशिवाय कुणी मास्क नसताना थुंकताना दिसला तर त्या व्यक्तीकडून 1000 रुपये दंड घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी आज घोषीत केले.

 

Web Title :- Ajit Pawar | Positivity rate of Pune city 18 percent, Ajit Pawar appeal to punekar take care

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PNB Job | पंजाब नॅशनल बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! ‘या’ पद्धतीने होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 350 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार