Ajit Pawar | राज्यात तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात होणार वाढ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात शिकवणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा (CHB Professors Salary) प्रश्न रखडला होता. तसेच राज्यातील काही मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यपकांच्या भरतीचा (Professors Recruitment 2022) प्रश्नही रखडला होता. परंतु आता यावर तोडगा काढत अशा महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी मोठा निर्णय (Salary Increased) घेण्यात आला आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.

 

 

वरिष्ठ महाविद्यालयातील (Senior College) प्राध्यापकांची भरती प्रक्रिया व तासिका तत्त्वावर (CHB) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत बैठक झाली. राज्यातील महाविद्यालयातून तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission (UGC)  निकषानुसार वाढवण्याचा निर्णय झाला, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करुन दिली आहे.

 

 

तसेच अजित पवार यांनी विद्यापीठांचं आकृतीबंध तातडीनं पूर्ण  करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद- National Assessment and Accreditation Council) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना 50 टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच प्राध्यापकांची भरती होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

 

राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं,
यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशाही सूचना अजित पवार यांनी दिल्या.
या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | professors who are on clock hour basis will get more money dcm ajit pawar announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Police Suspended | 6 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन ! 40 लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘… म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं’ – संजय राऊत