Ajit Pawar | ‘या’ कारणामुळं पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकार (Central Government) बरोबरच सध्या मोठ्या प्रमाणात सीएसआरमधून (CSR) जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होत आहे. केंद्र शासन लस सोबत सिरींज (Syringe) पण उपलब्ध करुन देते. पण सीएसआरमधून केवळ लसच उपलब्ध होत असून, सिरींजचा खर्च संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सुयांचा तुटवडा जाणवत असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. पण आता जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) निधीतून सुया खरेदी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा शुक्रवारी (दि.1) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
या आढावा बैठकीसाठी खासदार, आमदार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

पुण्यात सिरींजचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता.
त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) म्हणाले, लसीकरण सुरु झाल्यापासून डोससोबत सुईचाही पुरवठा होत होता.
मात्र राज्य सरकारकडून (State Government) पूर्वसूचनेशिवायच सुईचा पुरवठा (Needle supply) बंद झाला. शिवाय ही सुई खुल्या बाजारात उपलब्ध नाही.
त्याचा परिणाम स्वाभाविकपणे लसीकरणावर (vaccination) झाला.
लसीकरण बंद राहू नये म्हणून तातडीने 1 लाख पर्यायी सुई खरेदी केल्याने लसीकरण सुरळीत झाले असे महापौरांनी काल म्हटले होते.
त्यानंतर आज अजित पवार यांनी सुईच्या तुटवड्यावर स्पष्टीकरण दिले.

 

Web Title : Ajit Pawar | Pune is facing shortage of vaccine needles due to ‘this’ reason – Ajit Pawar (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock Tips | 2021 मध्ये ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांचे पैसे केले 3 पट; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Balasaheb Thorat | खबरदार ! शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढायला लावल्यास कारवाई करणार – बाळासाहेब थोरात

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळताहेत’