पुण्यामध्ये आता कडक निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत असतानाच, याचबरोबर पुण्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. तर पुण्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या ही तब्बल ५० हजारापर्यंत गेली आहे. या स्थितीवरून आज (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तर रुग्णसंख्या कमी झाली नाही तर येत्या शुक्रवारी (२ एप्रिल) आम्ही कडक निर्णय़ घेऊ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुढे पवार म्हणाले, ग्रामीण भागात सुविधा वाढवण्याचा निर्णय. तसेच, आता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्या बोर्डाच्या नियमानुसार होतील. याकाळात पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असणार आहे असे ते म्हणाले, दरम्यान, कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून नाईलाजाने कडक निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जे नियम आहेत ते पाळा असे स्पष्ट आवाहन अजित पवार यांनी केले आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर बंधनकारक आहे. कोरोनाची पहिली लाट होती तेव्हा जी भीती होती ती आता राहिलेली नाही. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका बसला असल्याचंही अजित पवार यांनी म्हटले आहे. तर आता पुण्यातील नियमावली काय आहेत जाणून घ्या.

नियम पुढीलप्रमाणे :
– बोर्डाच्या परीक्षा नियमानुसार होतील
– रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय पूर्वीसारखाच
– लग्नास ५० व्यक्तीची संख्या बंधनकारक
– अंत्यविधीची कार्यक्रम २० लोक
– शाळा-महाविद्यालये बंद राहणार
– सार्वजनिक उद्याने सकाळीच सुरु राहतील
– मॉल्स, मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहांत ५० % उपस्थिती
– सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
– सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी
– पंचायतीपासून संसदेपर्यंत असणारे प्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद करावेत

काय बंद राहणार?
शाळा, महाविद्यालये (१० वी, १२ वीचा अपवाद वगळता).
शहरातील सार्वजनिक उद्याने (गार्डन्स). (फक्त रोज सायंकाळी)
गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस. (पुढील आदेशापर्यंत)
रात्री १० वाजण्याच्या पुढे दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट.
मोठे लग्न समारंभ, सभा, सार्वजनिक कार्यक्रम.
रात्री १० च्या पुढे मॉल्स, चित्रपटगृहे.
रात्री १० च्या पुढे रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स.

काय सुरु राहणार?
दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट (रात्री दहा वाजेपर्यंत).
हॉटेलमधून जेवणाचे पार्सल नेणे (फक्त रात्री १० ते ११ या वेळेत)
सार्वजनिक उद्याने सकाळी ६ ते १० या वेळेत चालू राहणार.
लग्न, अंत्यविधी व अन्य समारंभ (लग्नासाठी ५०,अंत्यविधीसाठी २० व्यक्तीं).
अभ्यासिका निम्म्या क्षमतेने.
आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा.
रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स (रात्री १० वाजेपर्यंत).
सार्वजनिक वाहतूक (निम्म्या क्षमतेने).