Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या सभेआधी बॅनर लावण्यावरून मोठा वाद, दोन गटात तणाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Ghodganga Cooperative Sugar Factory) प्रचाराची सभा होणार आहे. या सभेपूर्वी बॅनर (Banner) लावण्यावरून कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गटात सध्या यावरून तणाव आहे. 5 हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद का करून घेतले नाही? असा जाब फ्लेक्सच्या माध्यमातून विरोधकांनी विचारला असून हा फ्लेक्स सभास्थळी लावला होता. यावरून हा वाद निर्माण झाला. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. (Ajit Pawar)

 

शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्यावर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांची 25 वर्षापासून सत्ता आहे, पण यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे (Dada Patil Pharate) यांनी पॅनल उभे करून कडवे आव्हान दिले आहे.

 

दादा पाटील फराटे यांच्या आव्हानानंतर वातावरण निर्मितीसाठी आमदार अशोक पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar),
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची सभा लावली आहे.
या कारखान्यावर 450 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा विरोधक करत आहेत.
पण आमदार अशोक पवार यांनी म्हटले आहे की, विरोधकांचा हा अपप्रचार आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | pune shirur ghodganga sakhar karkhana banner controversy before ajit pawar visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या