अजित पवारांना ‘शिक्षा’ मिळणार की मंत्रिपद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतले आहेत. शरद पवार आता अजित पवारांना धडा शिकवणार की, राष्ट्रवादीत परतल्याबद्दल मंत्रीपदाचे बक्षीस देणार याविषयी चर्चा सुरु झाली आहे. कारण शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या अनेकांचा बंदोबस्त केला आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले आणि सर्व आमदार माघारी परतले. यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अजित पवारांच्या अपयशी बंडखोरीनंतर आता त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांना मंत्रिपद दिले जाणार की नाही याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज ) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पडला. उद्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Visit : Policenama.com