माढ्यामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला ?

 अजित पवारांकडून गौप्यस्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माढा मतदार संघ हा लक्षवेधी मतदार संघ ठरला आहे. सुरुवातीला या मतदार संघातुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लढणार होते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता राष्ट्र्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे माढा मतदार संघात भाजपशी टक्कर द्यायला कोणता उमेदवार राष्ट्रावादीकडून लढणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे असे असताना आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने माढ्यातून विजयसिंह यांना तुम्ही लढा असं सांगितलं होतं. पण त्यांनी दुसरंच नाव दिलं. त्या नावाला माळशिरस वगळता माण-खटाव, फलटण सगळीकडून विरोध होता. नंतर त्यांनी फोनच बंद करून ठेवला होता. आता आम्ही माढ्यामध्ये नवीन तरुण उमेदवार देणार आहोत,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माढ्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील त्यांचे नाव चर्चेत होते मात्र रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे.

You might also like