Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर (Pimpri Chinchwad Tour) आहेत. या दौऱ्यात अजित पवार दिवसभरात 40 गणेश मंडळांना भेटी देऊन आरती करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते काही उद्घाटने होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांचे पुणे-मुंबई महामार्गावर (Flex on Pune-Mumbai Highway) ‘भावी मुख्यमंत्री’ असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मॅजिक फिगर 145 हा आकडा असतो. तो गाठल्याशिवाय कुणी मुख्यमंत्री होत नाही. केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं. (Ajit Pawar)

रोहित पवार यांचे पुणे-मुंबई महामार्गावर उर्से टोल नाका येथे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावण्यात आला आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हायचं कोण शिल्लकच राहणार नाही, सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत. माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना पाठीमागे सांगितलं होतं की असे फ्लेक्स लावून काही उपयोग नाही. यामध्ये केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर 145 चा आहे तोच मुख्यमंत्री होतो अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केलेल्या टीकेला अजित पवार म्हणाले, हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळविरांची संख्या वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं. (Ajit Pawar)

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलताना अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण हे महत्त्वाचं आहे. मागील सरकारने देखील मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ते हायकोर्टात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आलं. त्यांचं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं. मात्र, ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) टिकलं नाही. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत राहून आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणासंबंधी हे सरकार सकारात्मक असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

मुस्लीम आरक्षणावर (Muslim Reservation) बोलताना अजित पवार म्हणाले,
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तो समाजदेखील महत्त्वाचा घटक आहे. याबाबत आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज