Ajit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडच्या (Beed) दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा ताफा आज (शुक्रवार) आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी (health department staff) अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी (Police) सौम्य लाठीचार्ज (baton charge) करावा लागला. त्यामुळे या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या एका मराठा आंदोलकास (Maratha agitators) पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) ताफा पुढे निघून गेला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

बैठक सुरु असताना कंत्राटी नर्सचे बाहेर आंदोलन (nurses protests amid meeting)
कोरोना (Corona) आणि खरीप हंगाम संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक (District level review meeting) घेण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे बीड दौऱ्यावर आले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), राजेश टोपे (Rajesh Tope) आणि लोकप्रतिनिधी, अधीकारी यांच्यात बैठक सुरु असताना कंत्राटी नर्स (temporary Nurse) आणि मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलकांना आपल्या मागण्यासाठी बाहेर आंदोलन (Movement) केले. यावेळी पोलिसांनी 100 पेक्षा अधिक कंत्राटी नर्सना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (Dr. Babasaheb Ambedkar Bhavan) परिसरात स्थानबद्ध केले. बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) ताफा आंदोलनकर्त्यांनी आडवला.

निवेदन देण्यासाठी आले होते कंत्राटी नर्स
कोरोना (Corona) संकट काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली.
मात्र, तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला कामावरुन कमी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या संदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांना निवेदन (Statement) देण्यासाठी कंत्राटी नर्स यांनी आंदोलन केले.
अजित पवारांचा ताफा जात असताना अचानक गाडी समोर आंदोलक आले आणि त्यांनी गाडीचा ताफा रोखला.

…म्हणून महाराष्ट्रात होतेय अतिवृष्टी, तज्ज्ञांनी केला महत्वपुर्ण खुलासा, जाणून घ्या

पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज (Police uses co-ordinated assault on protesters)
आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी (Police) आंदोलकांची धरपकड सुरु केली.
त्यावेळी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. निवेदन देण्यासाठी आलेल्या परिचारिकांना लाठीचा प्रसाद मिळाला. यामुळे परिचारिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजित पवार यांना भेटण्याची मागणी करत एकाने जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : ajit pawar s welcome in beed district police stick charge on contract nurses while maratha protesters are detained

हे देखील वाचा

Pune News | ट्रकचालकांना लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी

Corona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या