Ajit Pawar | जरंडेश्वर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईनं राजकारण तापलं, अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप; म्हणाले…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) मालमत्ता ईडीनं (ED) जप्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे अडचणीत आल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune) झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तरं दिली. जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. हा कारखाना संचालक मंडळाने विकलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळ (Board of Directors) ईडीच्या कारवाईला (ED action) न्यायालयात आव्हान देईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

 

CBI चौकशी मागील गौडबंगाल काय ?

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, या प्रकरणाची अनेकदा चौकशी झाली. चौकशी करा पण चौकशीत पारदर्शकता असावी. सीबीआय चौकशी मागील (CBI inquiry) गौडबंगाल काय आहे याची जनतेला माहिती आहे, असेही पवार म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्देशानुसार कर्ज थकवणाऱ्या 14 कारखान्याची विक्री करण्यात आली. त्यात जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) सुद्धा होता. हा कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यांनी टेंडर (Tender) भरलं होतं. पण त्यात सर्वात जास्त टेंडर गुरु कमोडिटी मुंबई (Guru Commodity Mumbai) या कंपनीचे होते. कंपनीने 65 कोटी 75 लाखांची बोली लावली होती, तो कारखाना त्यांना विकण्यात आला. असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

…म्हणून ईडीने त्यावर टाच आणली

जो कारखाना गुरु कंपनीने (Guru Commodity Mumbai) घेतला होता तो बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड (BVG Group Hanmant Gaikwad) यांनी चालवायला घेतला. त्यांना पहिल्या पाच वर्षात तोटा (Loss) सहन करावा लागला. त्यामुळे ते बॅकफूटवर गेले. त्यानंतर ती कंपनी माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) यांनी चालवायला घेतली. पुढचे 2 ते 3 वर्षे तोटाच झाला. त्यामुळे त्यांनी काही बँकांशी चर्चा करुन, रितसर परवानगी घेऊन कारखान्याची क्षमता वाढवली (Increased factory capacity). परंतु कारखाना गुरु कमोडिटीच्या (Guru Commodity) नावाने असल्याने ईडीने (ED) त्यावर टाच आणली. गुरु कमोडिटीवर ईडीने का टाच आणली याची मला माहिती नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

कारखान्याची विक्री संचालक मंडळाने केली नाही

अजित पवार पुढे म्हणाले, एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या, सीआयडी (CID), अँटी करप्शन ब्युरोने (Anti-Corruption Bureau) चौकशा केल्या. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी ज्याच्याकडे अपिल करायची आहे, त्याच्याकडे करेल. अनेकांचे जीवन या कारखान्यावर अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया (Legal process) पूर्ण करण्यात आल्या होत्या. कारखाना विक्री संचालक बोर्डाने (Board of Directors) केली नाही, तर न्यायालयाच्या आदेशाने विक्री करण्यात आल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

काय घोटाळा झाला ते दाखवा

मागील काही दिवसांपासून काय राजकारण सुरु आहे, ते सर्वांना माहिती आहे. त्याच्या मागचं कारण कळायला मार्ग नाही. परंतु शेवटी न्याय मिळतो. माझ्या माहितीनुसार, सर्वात जास्त किंमत जरंडेश्वर साखर कारखान्याला मिळाली आहे. घोटाळा काय झाला ते दाखवा ना. उद्या मी भाजपच्या (BJP) नेत्यावर आरोप केल्यास घोटाळा झाला म्हणायचं का ? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी विचारला.

Web Titel :- ajit pawar said about enforcement directorate (ed) action on jarandeshwar factory in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू