अजित पवार म्हणाले…म्हणून मुलाला दिला ‘राजकारण’ सोडून शेती, व्यवसाय करण्याचा ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांना सांगितले की अजित पवार यांनी मुलाला म्हणजेच पार्थ पवारला संपर्क साधून सांगितले की राजकारणापेक्षा आपण शेती, व्यवसाय करु. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत यावर बोलताना स्पष्ट केले की मी मुलाला सांगितले की तू राजकारणापेक्षा आपल्या व्यवसायात, शेतीत लक्ष घालं. कारण मी अनुभवले की राजकारणात लोकांसाठी काम करताना अनेकदा कारण नसताना आपल्यावर टीका होते, बदनामी होते. त्यामुळे मी मुलाला हा सल्ला दिला.

आता मी सांगेल ते करायचे –
अजित पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की शरद पवार साहेबांशी मला सांगितले की मी तुझे ऐकून घेतले आता यापुढे मी जे काही सांगेल ते तुला ऐकावे लागेल.

कालच्या राजकीय नाट्यानंतर आता अजित पवार यांनी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले, ते म्हणाले की शरद पवारांचा या बँक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, ज्या साहेबांमुळे मी इथपर्यंत पोहचलो. शिखर बँक प्रकरणात साहेबांचे कोणत्याही कारण नसताना नाव घेण्यात आले. माझ्यामुळे साहेबांची बदनामी होत आहे. या विचारातून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला, त्यांना मी फोन बंद केला.

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, ज्यात जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगळ भुजबळ यांचा समावेश होता. या पत्रकार परिषदेत शरद पवार मात्र उपस्थित नव्हते.

Visit : Policenama.com