आता मी बोलण्यापुर्वी 50 वेळा विचार करतो : अजित पवार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या बेधडक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे हजर जबाबी उत्तराच्या स्टाईलमुळे ते अनेकांचे चाहते आहे. मात्र, याच शैलीमुळे ते अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांनी तोलूनमापून बलणे सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याचा अनुभव सर्वांनाच आला.

अजित पवार प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले, अनेकवेळा एखाद्या गोष्टीची अर्थ ‘ध’ चा ‘म’ असा काढला जातो, असे इतिहास सांगतो. मी तर आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो. सर्व गोष्टी तोलून मापून बोलाव्या लागतात. ज्यातून गैरसमज निर्माण होतात, शंका-कुशंकेला वाव मिळेल असे वक्तव्ये केली जाऊ नयेत अशी अपेक्षा आपण सहकाऱ्यांकडून देखील व्यक्त करतो, असे अजित पवार म्हणाले.

पत्रकाराशी संवाद साधत असताना त्यांना अशोक चव्हाण यांनी सरकारमधून पडण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर विचारण्यात आले. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली अजित पवार पुढे म्हणाले, मध्यंतरीच्या काळात सिंचन खात्यातील अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान माझ्यासह अनेकांची चौकशी झाली. चौकशी दरम्यान अनेकांना यामध्ये गुंतून पडावे लागले. चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली. यात अनेक प्रकल्प रखडले. पण आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून सिंचन प्रकल्पांना भरीव निधी उपलब्ध होईल.

बाकिच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, जोपर्य़ंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही. त्यामुळे बाकिच्यांनी काहीही बोलून उपयोग नाही.

फेसबुक पेज लाईक करा