Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात (Pune District) पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीला अटकाव घालण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन (Pune Weekend lockdown) लावण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीत आज घेण्यात आला. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.Ajit Pawar | separation 15 days those going out pune district
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं अद्यापही प्रमाण आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शनिवार-रविवार गर्दी आणि रांगा लागत आहेत. लोकं का असं करतायेत कळत नाही. नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. अधिक लोक बाहेर जात राहिले तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या लोकांना 15 दिवस विलागिकरणात (Quarantine) राहावे लागेल याचा विचार सुरू असल्याचं देखील पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाहीये. म्हणून हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचं पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.

अनेक देशात लसीकरण होऊन देखील पुन्हा लाट आली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मधील मृत्यूंचा अभ्यास केला तर 60 टक्के मृत्यू हे 60 पेक्षा कमी वयाचा लोकांचे आहेत. आगामी आठवड्यामध्ये पुण्याचा देखील रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 43 टक्के नागरिक कोणताही आजार नसणारे आहेत. महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान, आगामी आठवड्यामध्ये होणाऱ्या OBC आरक्षणाचा बैठकीसंदर्भात मी संबंधितांशी याबाबत चर्चा करेन आणि नियम पाळावे यासाठी सूचना देईन. दरम्यान पर्यटनासाठी शनिवार-रविवार बाहेर पडायचे कारण नाही इतर दिवशी नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  Ajit Pawar | separation 15 days those going out pune district

हे देखील वाचा

SBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का? मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी

Sangli News । रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक, सांगलीतील धक्कादायक प्रकार

Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

अखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई