Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | ‘आजच्या दिवशी मी कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण…’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि. 12) वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील यावेळी भाषण केले. यावेळी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. (Ajit Pawar – Sharad Pawar Birthday)

 

पवार (Ajit Pawar) म्हणाले, प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. मी बोलतोय त्याला काही नेते अपवाद आहेत, पण सर्वांनीच तो प्रयत्न करायचा आहे. आम्ही सर्वांना मार्गदर्शन करतो. पण तुमच्या जिल्ह्यात तुमच्याशिवाय कोणीही निवडून येत नाही. मी शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी कोणाची बिन पाण्याने करायची ठरवले नव्हते. पण जे खरे आहे ते बोलले पाहिजे. मी खरे बोलणारा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे. त्याला मी तरी काय करू?

मी माझ्या पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील याचा विचार करतो असतो, प्रयत्न करत असतो.
यासाठी दिलीप वळसे पाटील आणि आम्ही सगळे जिवाचे रान करतो.
तशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी,
आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक शपथ घ्या, की आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही मतभेद असतील,
ते सगळे संपवून टाकायचे आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणायचे. याशिवाय ग्रामपंचायत, पंचायत समिती,
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी या सगळ्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे कशी निवडून येतील,
यासाठी आज सर्वांनी निश्चय करूया,अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पवार यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | ncp leader ajit pawars guidance speech to the activist leaders on the birthday of ncp president sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार