Ajit Pawar | पुण्यातील दुकाने, हॉटेल्स सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी? अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लागू (Pune Corona Restrictions) करण्यात आले आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) पाहून पुण्यातील निर्बंध शिथिल करणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation) पॉझिटिव्हिटी रेट 3.9 वर आल्याने पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी यावर सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले. त्यामुळे पुणेकरांना कोरोनाच्या निर्बंधामधून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील हॉटेल्स आणि दुकानांची वेळ 5 ऐवजी 7 पर्यंत करावी अशा सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर सोमवारी सकारात्मक विचार केला जाईल. आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय घेता येईल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Corona vaccination) झालेल्यांना बाहेर पडता येईल का ? याबाबतीत विचार सुरु असून त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, अशी माहिती अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

पावसाचा पुणे-कोल्हापूरला मोठा फटका

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे दरडी कोसळत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. 9 जिल्हे पूर बाधित असून 76 जणांना आपले प्राण गमावले लागले आहेत. 59 लोक बेपत्ता आहेत, 38 लोक जखमी झाले आहेत. कोल्हापूर-पुणे जिल्ह्याला (Kolhapur-Pune district) पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढिचा (Global warming) फटका असल्याचं सध्या तज्ज्ञांचं मत आहे. राज्यात 90 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या राज्यात NDRF चे 21 पथक कार्यान्वित असल्याची माहिती अजित पवारांनी दिला.

Web Title : Ajit Pawar | Shops and hotels in Pune allowed to continue till 7 pm? Ajit Pawar said …

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

CoWin Portal वर स्वता दुरूस्त करू शकता तुमचे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट,
‘ही’ आहे अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल,
जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त;
जाणून घ्या आजचे दर