काय सांगता ! होय, चक्क क्रिकेटच्या मैदानात ‘अजित पवार’ शॉट, तुम्ही पाहिलाय का ? (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंचे काही विशेष शॉट खेळले जातात. उदाहराणार्थ, हेलिकॉप्टर शॉट. परंतू तुम्ही कधी राजकीय नेत्याचे नाव असलेला शॉट पाहिलाय. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे ‘अजित पवार शॉट’चा. राजकीय मैदानात जसा अजित पवाराचं नाव गाजतंय तसंच क्रिकेटच्या मैदानात देखील अजित पवार शॉटची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी आयसीसीने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एक दिवसीय फोर्ड ट्रॉफी स्पर्धेचा आहे. यात ग्लेन फिलिप्सने अशी काही फलंदाजी केली की गोलंदाजांचा फडशाच पाडला. याच सामन्यात ग्लेनने एका वेगळाच शॉट खेळला. या शॉट असा काही होता की गोलंदाज आणि सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील चाट पडले. क्रिकेटमध्ये हा शॉट कधीही पाहायला मिळाला नाही. त्यामुळे आयसीसीने या शॉटचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करुन या शॉटला नाव देण्यास सांगितले.

ऑकलंडने आक्रमक खेळी करत 50 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 310 धावांचा डोंगर उभारला. याचा पाठलाग करताना ओटागोचा नील बूम यांने 66 धावांची खेळी केली. परंतू त्याला सोडून एकाही फलंदाजाला उत्तम खेळी करता आला नाही. संपूर्ण संघ 213 धावात कोसळला. ऑकलंडने या सामन्यात 97 धावांनी विजय मिळवला.

Ajit Pawar Shot

ग्लेनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या शॉटच नाव काय याची चर्चा सुरु झाली. काही भारतीय चाहत्यांनी या शॉटला अजित पवार शॉट असे नाव दिले. महाराष्ट्रात राजकीय मैदानात आणि क्रिकेटमध्ये खेळाच्या मैदानात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. महाराष्ट्रात तर राजकीय आखाड्यात चांगलाच सामना रंगला होता. या जंगी आखाड्याने राज्यात उशीरा का होईना सरकार स्थापन झालं.

त्यात राजकीय नाट्य रंगलं ते 27 नोव्हेंबरला अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केलं. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस एका रात्रीत मुख्यमंत्री झाले आणि अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जेवढी घाई सरकार स्थापनेची झाली तेवढ्याच घाईत हे सरकार कोसळलं. त्यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापन करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद बसवलं. याच राजकीय नाट्यामुळे या शॉटला अजित पवार नाव असावं अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली.

Visit : policenama.com