…तर अजित पवारांनी पुण्यातून कारभार चालवावा; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटते की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘मी चॅलेंज केले होते, की अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. 24 तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवार यांनी पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. तसेच त्यांनी अजित पवार यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे, असे म्हटले आहे. तसेच अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असे वाटते, की त्यांनी एकतर पुणे किंवा मुंबईतून कारभार चालवावा’.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने त्यांचे अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवले आहे. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. 10 दिवसांसाठी तब्बल 2 लाख 69 हजार इंजेक्शन्स दिली आहेत. ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होत आहे तिथेही 1 लाख 40 हजार इंजेक्शन दिली गेली आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.