Ajit Pawar | ‘…नाहीतर ‘घंटा’ मिळणार नाही’ – अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले, बांधकामाच्या (Construction) चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. नाहीतर ते काय देणार घंटा, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली. पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) निंबूत येथे समता सहकारी पतसंस्थेच्या (Samata Sahakari Patsanstha) समता पॅलेस वातानुकूलित नुतन वास्तूचे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. संजय जगताप (Sanjay Jagtap) आणि दत्ता मामांना सांगावे लागते. आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा, फक्त तुम्ही राज्यमंत्री इंदापूरचे (Indapur) नाही. मलाच विनंती करावी लागते, मला तरी काही तरी द्या. बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा… असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

तसंच, आपल्या विधानामुळे वाद होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आता गाडी घसरायला लागली,
आता थांबतो, असं म्हणत अजित पवारांनी आपले भाषण आवरते घेतले.

 

आमच्या दिलीपराव यांनी चांगले काम केले आहे. इतरांनीही चांगले काम करावे.
आपल्या परिसरात चांगले काम करुन आर्थिक परिस्थिती सुधारावी. इतरांची परिस्थितीही चांगली करावी.
आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे चांगले काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | speaking on the allocation of maharashtra government funds ajit pawar spoke controversially in baramati

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा