निवडणूक आयोगाच्या नोटीशीवर अजित पवारांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळाला. राज्यात आघाडीच्या मोजून ५ जागा आल्या त्यातील एक काँग्रेसची होती तर बाकीच्या ४ जागा राष्ट्रवादीच्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसला झटका देत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पक्षास निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे, हे वृत्त मी वर्तमान पत्रात वाचले. त्यावर उद्या पक्षाची बैठक होईल. तसंच निवडणूक आयोगाच्या माहितीत नेमकी कोणती कमी राहिली आहे, ते पाहून पक्ष त्या नोटीशीला उत्तर देईल, असं त्यांनी सांगितलं.

निवडणुक आयोगाने दिलेल्या नोटीशीवर राष्ट्रवादीला २० दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला जमलेले नाही. त्यामुळेच पक्ष या नोटीसला काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी हे नियम आहेत. निवडणूक आयोग १९६८ च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते. ते नियम पुढील प्रमाणे आहेत.

१. राष्ट्रीय पक्ष असण्यासाठी त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजेत.

२. त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे.

३. चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like