अकोलेमध्ये अजित पवारांच्या ‘त्या’ वक्‍तव्याचे पडसाद, बहुजन समाजामध्ये नाराजी

अकोले (जि. नगर) :  पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांची धोतर फेडण्याची भाषा करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अकोले तालुक्यातील बहुजन समाजामध्ये नाराजी पसरली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा अकोले शहरातील बाजार तळावर दोन दिवसांपूर्वी नुकताच पार पडला. या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी करीत पिचड पिता पुत्रांवर टीकास्त्र सोडले. यावेळी अजित पवार यांचे भाषण ऐन जोमात आले असताना व्यासपीठा शेजारी बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी गायकरांचं काय करायचं असा आवाज दिला.

यावेळी सुरुवातीला अजित पवारांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. मात्र दुसऱ्यांदा एका कार्यकर्त्याने पुन्हा गायकरांचं करायचं काय असा आवाज देताच अजित पवार यांनी तू आधी घड्याळाचे बटण दाब, मग त्या गायकरांचं धोतरच फेडू असा उल्लेख केला.

दरम्यान, सिताराम पाटील गायकर यांचा केलेला हा उल्लेख अकोले तालुक्यातील बहुजन समाजातील नेत्यांना रुचला नाही. सिताराम गायकर यांना अकोले तालुक्यातील मुळा, प्रवरा आढळा खोऱ्यात मानणारा नागरिकांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अजित पवार यांनी गायकर यांचे धोतर फेडण्याची केलेली भाषा अयोग्य असल्याचे बहुजन कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सिताराम पाटील गायकर यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. त्यामुळे गायकर यांना अकोले तालुक्यातील बहुजनांचा नेता म्हणून असे ही संबोधले जाते. गायकर यांना राजकीय गुरू मानणारे अनेक कार्यकर्ते अकोले तालुक्यात आहे. जे पिचडांचे देखील ऐकत नाही, ते गायकरांचे ऐकतात. सध्या राष्ट्रवादी पक्षावर निष्ठा असणारे व गायकर यांना मानणारे कार्यकर्ते अकोले तालुक्यात आहे. मात्र आपल्या राजकीय गुरुवरच अजित पवार यांनी खालच्या पातळीची टीका केल्याने हे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

Visit : policenama.com