शिवसेनेच्या वतीने अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध

शिरूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दुपारी  सामना पेपर जाळल्याच्या निषेधार्थ  शिरुर शहर शिवसेनेच्या वतीने आज माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी शहर प्रमुख संजय देशमुख, शिवसेना महिला आघाडीच्या उपसंघटक विजयाताई टेमगिरे, नगरसेविका अंजली थोरात,शहर उपप्रमूख मयूर थोरात, सुरेश गाडेकर,  पप्पू  गव्हाणे, नितीन जामदार, संदीप जामदार, गोरख करंजुले, यश पवार व  शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी अजित दादा पवार यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकर्त्यांनी सामना पेपर जाळला त्यांचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामना पेपर जाळून निषेध व्यक्त केला. सामना पेपरच्या अग्रलेखामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयी खरमरीत टीका केली होती. याचा निषेध राष्ट्रवादी कँग्रेसने आज सामना पेपर जाळून केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी,  राष्ट्रवादी युवकचे  तालुकाध्यक्ष  सागर निंबाळकर, संभाजी कर्डिले, रवी खांडरे, अमोल चव्हाण, रंजन झांबरे, हाफीज बागवान, निलेश पवार, आबिद शेख, राहील शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.