पवारांचं जाहीर सभेतच वोटिंग … म्हणले शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा ?

मंचर ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – खरेतर निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उभा करायचा हा निर्णय सर्वस्वी पक्षांतर्गत घेतला जाणारा निर्णय असतो . मात्र गुरुवारी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचा लोकसभेसाठीचा उमेदवार जनतेनेच घोषित केला.

मंचर यथे झालेल्या एका सभेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी , तुम्हाला लोकसभेसाठी कोणता उमेदवार पाहिजे… !  असे विचारत विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि अमोल कोल्हे अशा चौघा जणांच्या नावाबाबत विचारणा झाली. त्यावेळी लांडे, निकम आणि गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल कोल्हे यांचं नाव घेताच सभागृहात एकच जल्लोष झाला. या जाहीर मतदानात खासदारकीच्या उमेदवारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंना भरघोस प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

शिवबंधन सोडून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 
शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन सोडून १ मार्चला राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरेतर राष्ट्रवादीला कोल्हे यांनाच शिरुर लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी कोल्हेच दोन हात करु शकतात, असा राष्ट्रवादीने पक्का ग्रह बांधला आहे. दरम्यान आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकी सध्या चर्चेचा विषय आहे.