Ajit Pawar | ‘नमो’ मंदिराबाबत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले – ‘पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | देशभरात पुणेरी पाट्यांची नेहमीच चर्चा होत असते. इथल्या देवांची, मंदिरांची तसेच परिसराच्या नावांची चर्चा आणि कुतूहलाचा विषय असतो. नुकतंच औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच मंदिर उभारण्यात आल होत. मग काय सर्वत्र याचीच चर्चा सुरू होती. त्यामध्ये आणखी भर पडली ती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मिश्किल टिप्पणीची. त्यांनी आपल्या खास शैलीत पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही असे म्हंटले आहे.

वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State for Forests Dattatraya Bharane), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (PMC Leader of Opposition Deepali Dhumal), पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतूहल असते. पाट्यांबाबत पुणेकरांचा हात कोणीही धरू शकत नाही. आता ज्या भागात भूमिपूजन होत आहे त्या भागाचे नाव डुक्कर खिंड आहे. कारण काही वर्षांपूर्वी या भागात रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असं नाव पडलं आहे, असे म्हणत अजित पवार यांनी यावेळी शहरातील काही मंदिरांची नावे दाखवली. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही असे म्हंटले त्यांच्या या विधानानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.

हे देखील वाचा

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ajit pawar talks about puneri patya and unique names of gods and temples in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update