रोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’? माजी मंत्री म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे (ajit pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी प्रा. राम शिंदे यांच्यात शनिवारी (दि.12) गुप्त बैठक झाली. ही बैठक कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर झाली. ही बैठक अर्धा तास झाल्याची चर्चा आहे. या दोन नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवारांनी केला होता राम शिंदेंचा पराभव

कर्जत-जामखेड मतदारसंघातील अंबालिका कारखान्यावर अजित पवार हे नेहमी येत असतात. याच मतदारसंघातून रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. शनिवारी सकाळी अजित पवार हे कारखान्यावर आले असताना राम शिंदे त्या ठिकाणी आले. या दोन नेत्यांमध्ये गोपनीय बैठक झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. असे असताना त्यांनी अजित पवार यांची भेट का घेतली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ही केवळ सदिच्छा भेट

भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची सध्या चौकशी सुरु आहे. हे खाते शिंदे यांच्याकडे असल्याने तो संदर्भ या भेटीला देण्यात येत आहे. तसेच शिंदे हे धनगर समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का ? असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले की, ही केवळ सदिच्छा भेट होती.

शिंदेंकडून भेटीचे खंडन

दरम्यान, राम शिंदे यांनी आपण अजित पवार यांची भेट घेतली नसल्याचे सांगत ही अफवा आहे असे सांगितले.
शिंदे यांनी भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. तसेच मी कर्जतमध्ये नसून पुण्यात आहे, असेही राम शिंदे यांनी सांगितले. परंतु त्यांनी या संदर्भात सविस्तर बोलणे टाळले.

हे देखील वाचा

 

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

नखे ​​सुंदर आणि मजबूत बनविण्यासाठी मॅनिक्युअर नाही तर ‘या’ 4 पदार्थांचे करा सेवन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ajit pawar talks rohit pawars opponent ram shinde closed door discussion but former minister said its rumours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update