ताज्या बातम्याराजकीय

Ajit Pawar | … म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार देता आले नाहीत – अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस (reward) देण्याची घोषणा केली. परंतु कोरोनामुळे (Corona) आर्थिक घडी विस्कटली. परिणामी नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस देता आले नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील एका पतसंस्थेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत असताना शेतकऱ्यांना 50 हजार का देता आले नाही, याची माहिती दिली.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून (Central Government) जीएसटीचे (GST) 25 ते 30 हजार कोटी रुपये येणे आहे.
अशा संकट काळात ही केंद्राकडून जीएसटीची रक्कम येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना चांगलेच सुनावले.
जामखेडला काल गेलो होतो. मात्र तिकडे कोणीही मास्क (Mask) वापरत नसल्याचे पाहायला मिळाले.
मी रोहितला म्हटलं, अरे शाहण्या तु आमदार आहेस (You are MLA). तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल.
मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत हे बरोबर नाही, अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावले.

 

Web Title : Ajit Pawar | Thats why farmers could not pay rs 50000 as reward say dy cm ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

H V Desai Eye Hospital | PBMA च्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालायत OPD चे उद्घाटन

Vikram Gokhale | राजकारण्यांनी ST ची वाट लावली, ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंचा संताप

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक ! पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

Ajit Pawar | अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना सुनावले, म्हणाले-‘अरे शाहण्या तु…’ 

Back to top button