Ajit Pawar | पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar |पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची (Pune Minor Girl Rape Case) घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक (Accuse arrest) करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन (Maharashtra government) घेईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.
यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा (railway employee) सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या 14 वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून (Pune Railway Station) घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण केलं होतं.
त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपींनी पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार केला.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (wanwadi police station) 8 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, 5 रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे.

 

 

Web Title : Ajit Pawar | The incident of rape of a minor girl in Pune is embarrassing, annoying – Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murder in Dhule | नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरचा सपासप वार करुन खून

Sharad Pawar | एकाचवेळी ED च्या इतक्या कारवाया यापुर्वी कधी पाहिल्या होत्या का? – शरद पवार (व्हिडीओ)

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट