Ajit Pawar | कोरोना संसर्गाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते; अजित पवार म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Corona virus) एक इशारा दिला आहे. त्यावेळी पवार हे बारामती येथे बोलत होते. ‘बारामती (Baramati) शहरासह तालुक्यात पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजास्तव पुन्हा कडक निर्बंध (Strict restrictions) लावावे लागतील. म्हणून सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे असून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सर्वानी नियमांचे पालन केले पाहिजे, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनीं म्हटलं आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता टास्क फोर्सने (Task Force) वर्तवली आहे, असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती परिसरातील विकासकामांची पाहणी केली. त्यांनतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोनाबाबत परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयाबाबत अजित पवार यांनी सविस्तर माहिती घेतली. बारामती शहरासह तालुक्यात पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांच्या पुढे वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील यामुळे सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढता कामा नये. टास्क फोर्सने (Task Force) सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरूय असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, परिस्थिती पाहता उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरून ऑक्सिजनचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे.
ज्यांनी लसीकरणाचे (Vaccination) 2 डोस घेतले आहेत, त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा.
लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित करावे. पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या.
तसेहच, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. हे चालणार नाही.
प्रत्येकाने मास्क वापरायलाच हवा.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षताही घ्यायला हवी, असं त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी संगितलं आहे.

Web Title :- Ajit Pawar | the third wave of corona is expected in september says ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Holidays | 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत बंद राहतील ‘या’ ठिकाणच्या बँका, लागोपाठ 5 दिवस आहे सुट्टी – पहा List

9to5 Google | स्मार्टफोन किंवा गाडी चोरीला गेल्यास आता ‘नो-टेन्शन’, Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यासाठी मदत

Maharashtra Police | राज्यातील ‘या’ 67 पोलीस अधिकारी-अंमलदाराना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर