Ajit Pawar To CM Eknath Shinde | अजित पवारांचा CM एकनाथ शिंदेंना सल्ला; म्हणाले – ‘नार्वेकरांना जवळ करा नाही तर तुमचं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar To CM Eknath Shinde | विधानसभा अध्यक्षांची आज निवड करण्यात आली. भाजपाचे राहुल नार्वेकर सभापतींच्या खुर्चीत विराजमान झाले. यावेळी त्यांच्या अभिनंदानाच्या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपा (BJP) आणि बंडखोर शिंदे गटावर खोचक शैलीत टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. (Ajit Pawar To CM Eknath Shinde)

 

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली.  ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांना जवळ करावे, नाही तर त्यांचे काही खरे नाही.

 

कारण नार्वेकर ज्या ज्या पक्षात गेले तेथे त्यांनी त्या पक्षाच्या नेतृत्वाला आपलेसे केले. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना आपलेसे केले. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलेसे केले. आता भाजपात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपलेसे केले. म्हणून शिंदे यांनी त्यांना जवळ करावे, नाही तर काही खरे नाही. (Ajit Pawar To CM Eknath Shinde)

अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितले मी उमेदवार होईन पण मला अपयश आले तर मला कुठे तरी सदस्य केले गेले पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचे सदस्यपद मिळाले. तेथे त्यांनी उत्तम काम केले. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

 

अजित पवार पुढे म्हणाले, भाजपाच्या जुन्या नेत्यांना जे जमले नाही, ते नार्वेकरांनी 3 वर्षात करून दाखवले.
भाजपातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसाठी देखील एक आश्चर्यकारक बाब आहे. बरेच नेते अनेक वर्षे काम करत आहेत.
सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना जे जमले नाही ते राहुल नार्वेकर यांनी 3 वर्षात करून दाखवले.
हा कौतुकाचा भाग आहे.

 

पवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावताना म्हटले की, मी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव सुचवले होते.
म्हटले काय बडबड करायची ती तिथे बसून करावी. किती तास, किती मिनिटे, किती सेकंद, किती वर्ष सगळे सागू द्यावे.
यानंतर सारवासारव करताना अजित पवार असे देखील म्हणाले, की मित्रांनो गमतीचा भाग आहे, जाऊ द्या.

 

Web Title :- Ajit Pawar To CM Eknath Shinde | NCP leader ajit pawar sarcastic comment on eknath shinde mentioning rahul narvekar in assembly session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला, सरनाईक-जाधवांच्या वेळी ‘ED-ईडी’ची शेरेबाजी