अजित पवार घेणार आशिष देशमुखांची मुंबईत भेट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

राजीनामा दिलेले भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी  दिली.आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला ? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य, पार्थ निवडणूक लढणार का? अशा विविध मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.जनतेचा रोष सोडा, इथे आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, समाधानी कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2348096a-c635-11e8-9845-e7fe85a80f37′]

भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षातले आमदार राजीनामे देत आहेत. मग जनतेत किती रोष असेल हे दिसून येतं. आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतक-यांवर हल्ला होत आहे. इथे समाधानी कोणीच नाही. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आशिष देशमुखांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

[amazon_link asins=’B00URFD45G,B07DX4VFJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f51780e-c635-11e8-a1d3-1f14101f3d64′]

आशिष देशमुख यांनी डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत विधानसभेत एन्ट्री केली. नागपुरात हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एन्ट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कोण आहेत आशिष देशमुख?
आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.यापूर्वी देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीकरिता मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिले होते . तसेच जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आमदार पदाचा राजीनामा देणार असा इशारा त्यांनी दिला होता . त्यानुसार त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

जाहिरात.