अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देण्याचे काम अजित पवार यांनी केले. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार समोर आले नव्हते. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या ठिकाणी पोहचले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असून या तिघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अद्याप समजू शकले नाही.

आज झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार कुठेही दिसले नाहीत. महाविकास आघाडीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, जयंत पाटील यांनी अजित पवार बैठकिला येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा परतणार का असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आला. महाविकास आघाडीच्या बैठकिनंतर अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर भेटण्यासाठी गेले.

दरम्यान, आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकिमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घ्यावे, अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांना परवानगी द्यावी, अजित पवार यांनी महाविकास आघाडीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा पक्षात स्थान घ्यावे अशी मागणी भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. त्यावेळी अजित पवार यांच्या समर्थात घोषणा देण्यात आल्या होत्या.

Visit : Policenama.com