अजित पवार यांनी आज केला लोकलने प्रवास

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – अजित पवार यांनी आज मुंबई लोकलने प्रवास केल्याची घटना आज घडली आहे. एका कार्यक्रमाला नियोजित वेळेत पोहचण्यासाठी आणि ट्रॅफिकच्या कारणामुळे अजित पवार लोकलने कार्यक्रमाच्या दिशेने गेले अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून प्रसारित करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या आजच्या लोकल प्रवासात त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार शशिकांत शिंदे,आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

एका नियोजित कार्यक्रमाला अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातून निघाले. परंतु त्यांना हे लक्षात आले कि आपण जर गाडीने प्रवास केला तर ट्राफिक मुळे वेळेवर पोहचणार नाही. म्हणून अजित दादांनी लोकलने जाणे पसंत केले. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत सीएसएमटी या स्टेशन वरून कसाऱ्याकडे जाणारी लोकल पकडली आणि त्यांनी लोकलचा प्रवास सुरु केला अजित पवार यांना खिडकीच्या शेजारचा बाक बसायला मिळाला होता.

त्यांच्या शेजारील बाकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बसले होते तर त्यांच्या सोबत आमदार शशीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड लोकलमध्ये बसलेले होते. अजित पवार या नेत्यांच्या ताफ्यासोबत डोंबिवली स्टेशनवर उतरले. त्यांना डोंबिवली येथेच एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते. लोकलच्या ज्या डब्यात अजित पवार बसले होते त्या डब्यातील लोकांनी अजित पवारांचे फोटो आणि व्हिडीओ आपापल्या मोबाईलवर काढून घेतले आहेत. एवढा मोठा नेता लोकल गाडीने प्रवास करतो यावर गाडीतील लोकांचा विश्वासच बसत नव्हता म्हणून त्या लोकांनी अजित पवारांचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईल मध्ये काढून घेतले आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील केले आहेत.

मुंबईच्या लोकलला मुंबईची जीवन वाहिनी म्हणतात. लोकलच्या प्रवासाला आपण ट्रॅफिकला उपाय म्हणून बघू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण आज खुद्द राजकीय नेत्यांनीच घालून दिले आहे. आजकालच्या चकचकीत आणि जगात आपणाला सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणे नकोसे झालेले आहे. त्यात लोकलचा प्रवास तर लोकांना धक्केखात करायला कसा आवडेल. परंतु ट्रॅफिकला उपाय करण्यासाठी लोकांनी लोकलचा वापर केला पाहिजे. मुंबईची लोकसंख्या ज्या पटीत वाढते आहे त्या प्रमाणात उपाय योजना आखल्या आणि राबवल्या जाऊ शकत नाहीत म्हणून यावर आपण आपल्या जीवनात काही बदल करून उपाय जर करू शकत असू तर ते आपण जरूर करून बघितले पाहिजे. या बाबाबींवर विचार करायला लावणारी कृती आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.