Ajit Pawar |’राज्याला काही नोटा छापण्याचा अधिकार नाही, निधी काटकसरीने वापरा’ – अजित पवार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारला (Central Government) नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही त्यामुळे निधी काटकसरीने वापरा (Use Funds Properly), असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि अधिकाऱ्यांनाही बजावले. तसेच बीडला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं.

 

बीड विधानसभा मतदारसंघात (Beed Assembly Constituency) 100 कोटी 60 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा व्हर्च्युअल माध्यमातून अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे देखील उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही. पण बीड जिल्ह्यात विकास कामांच्या (Development Work)  प्रकल्पांना यापुढे निधी कमी पडू देणार नाही. जनतेचा पैसा आहे, दर्जेदार कामे झालीच पाहिजेत, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना भरली.

 

तर बीडचा विकास आम्हाला करायचा आहे, असे स्वप्न आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पाहत आहोत.
दादा आम्हाला मदत करा, अशी मागणीच व्यासपीठावरील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.
तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळ देण्यासाठी आम्ही सहकार्य करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं.

 

Web Title :- Ajit Pawar | use state funds properly ncp leader ajit pawar warned the officers at beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा