Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar Warning | सरकार चालवताना हे बंद करा, ते बंद करा असे सांगायला आम्हाला आवडत नाही. पण काही वेळेला नाईलाज असतो. निसर्गापुढे आपले काही चालत नाही. कोरोनाची तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने खबरदारी घ्यावी लागत आहे. कधी सुरु करणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात यायचा. मात्र आता सहा महिन्यापासून बंद असलेली नाटकाची घंटा वाजली असल्याचे सांगत बॉलिवूडसाठी (Bollywood) सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Warning) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांना दिला.

गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आजपासून खुली झाली. पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar Warning) हस्ते नाटकाची घंटा वाजली. अजित पवार यांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु केली. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार म्हणाले, बालगंधर्व नाट्यमंदिराचं (balgandharva rang mandir) लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. यापुढे कलावंतांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. सध्या आमच्याकडे ५६ हजार कलाकारांची यादी आहे. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून ५ हजार रुपये देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोना काळात स्टेजवरचे कलाकार असतील किंवा बॅकस्टेजचे सगळ्यांनीच खूप काही सहन केलं आहे.मात्र लवकरच मंडळाबाबत निर्णय घेऊ. दिवाळींनंतर १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचे आश्वासनही पवार (Ajit Pawar Warning) यांनी यावेळी दिले. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती आवाक्यात आहे. देशात कोरोना लसीचा १०० कोटींचा टप्पा पार केला असून आमच्या मुळशी तालुक्याने शंभर टक्के लसीकरण केलेलं आहे.

 

Web Title : Ajit Pawar Warning | … However, Bollywood will remain in Mumbai! Ajit Pawar’s ‘stern’ warning to UP Chief Minister Yogi Adityanath (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन

Post Office RD Scheme | पोस्टाची ‘ही’ योजना 10 हजाराच्या गुंतवणुकीवर देईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या