वकिलांकडे जातो म्हणून अजित पवार पडले होते बैठकीतून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीच बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु होती. त्यावेळी अजित पवार यांनी वकिलाकडे जातो काम आहे, असे सांगून या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार तेथे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसले. काँग्रेस प्रभारी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही माहिती सांगितली आहे. तिन्ही पक्षांची बैठक शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरु होती. त्यात शनिवारी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते.

त्यानंतर शिवसेनेचे नेते बाहेर पडल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करीत होते. त्यावेळी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी वकिलाकडे काम आहे, असे सांगून बैठकीतून बाहेर पडले. अशी माहिती खर्गे यांनी सांगितली.त्यानंतर अजित पवार हे कोठे गेले याची कोणालाही माहिती नव्हती. त्यानंतर अजित पवार यांनी आपली पक्षनेतेपदी निवड झाल्याचे पत्र पक्षकार्यालयातून घेतले. त्यावर आपले स्वत:चे कव्हरींग लेटर जोडले.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचा मजकूर लिहून पत्र तयार केले होते. त्यानंतर त्यांनी काही आमदारांना फोन केले. त्यांना तुम्ही शरद पवार यांच्याबरोबर आहात का की माझ्याबरोबर असा प्रश्न विचारला. त्यातील १५ आमदारांनी आपण तुमच्याबरोबर आहोत असे सांगितले. त्यांना सकाळी राजभवनात येण्यास सांगितले.अजित पवार यांनी आज सकाळी शपथ घेतली. तेव्हा त्यांच्या पत्नी सुनेत्रा, मुलगा पार्थ यांच्यासह जवळपास १५ आमदार उपस्थित होते. मात्र, आता त्यातील काही आमदार आपल्यासाठी हे अनपेक्षित होते़ आपण पवार साहेबांबरोबर आहोत, असे सांगितले आहे़.

Visit : Policenama.com