अजित पवारांनी केलं नवे CBI संचालक जयस्वाल यांचे स्वागत, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या चार महिन्यापासून रिक्त असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्रमुखपदी अखेर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीने सोमवारी या पदासाठी सुबोध कुमार यांची निवड केली. सुबोधकुमार यांची CBI संचालक म्हणून 2 वर्षांसाठी नियुक्ती केल्याचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. यापूर्वी सुबोधकुमार यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी जयस्वाल यांचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी CBI च्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन राज्यातील पोलीस अधिकाऱ्याची सीबीआय संचालकपदी झालेली निवड राज्याचा गौरव वाढवणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा असे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान तेलगी प्रकरणापासून ते एल्गार परिषद, भीमा कोरेगाव, मालेगाव बॉम्बस्फोट अशी विविध प्रकरणे हाताळणारे सुबोधकुमार जयस्वाल आता CBI चा कार्भार हाताळणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून जयस्वाल यांचे ठाकरे सरकारशी मतभेद झाले होते. यादरम्यान केंद्र सरकारने जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीवरूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्युरोपांच्या फैरी झडल्या होत्या. जयस्वाल हे 1985 बॅचचे IPS अधिकारी आहेत.

Also Read This : 

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

 

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

 

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

 

केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !

 

फुफ्फुसाचा कर्करोगावर; मिरची गुणकारी असल्याचा संशोधकांचा दावा!

 

‘या’ 7 पध्दतीनं पसरू शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं संक्रमण, WHO म्हणालं – ‘सर्वजण सावधगिरी बाळगा’